तणावात असताना आपल्या मनात वेगेवेगळे बदलाव होतात. तसेच आपण कोणता जास्त वापरतो ह्यातही बदल होतो. तणाव नसताना आपण प्रबळ कार्यकर्ता जास्त वापरतो, त्याला साहाय्य म्हणून त्यानंतर सहाय्यक कार्यकर्ता वापरतो, व जसे चवड आहे तसे कार्यकर्ते हळू हळू कमी वापरले जातात. तणाव वाढल्यावर आपण आपल्या प्रबळ कार्यकर्त्यावर जास्त जोर टाकतो. तोच आपण तणावात वापरतो व तणाव दूर करायचा प्रयत्न करतो. तरीही तणाव दूर नाही झाल्यास आपण साहाय्यक कार्यकर्त्यावर जोर देतो, नाही म्हटल्यासारखे आपण प्रबळ कार्यकर्ता वापरतच नाही. तरी जर तणाव दूर नाही झाला तर आपण तिसऱ्या कार्यकर्त्याकडे वळतो, व तरीही जर तणाव दूर नाही झाला तर मग आपण निकृष्ट कार्यकर्त्याकडे वळतो. चौथ्या कार्यकर्त्याकडे वळल्यावर जरीही बाहेरील तणाव दूर झाला तरी आपण तणावात राहतो, व आपल्याला परत पाहिल्यासारख्या स्थितीत जाणे अवघड जाते. ह्याला निकृष्टची पकड असे म्हणतात. निकृष्टच्या पकडीतून सुटणे अवघड असते. ह्या काळात आपण वेगळेच वागायला लागतो. ENTJ सारखा तर्कस्त माणूस एकदम भावणूक होतो. निकृष्ट कार्यकर्ता प्रबळ नसल्याने आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. ह्या काळातून बाहेर निघायचे असेल तर आपल्या प्रबळ कार्यकर्त्याला जाणूनबुजून वापरावे लागते. मग हळू हळू आपण या पकडीतून सुटतो. जर निकृष्ट कार्यकर्त्याकडे पोहोचले तरी बाहेरील तणाव गेला नाही तर आपण आपल्या सावली भागात किव्वा शेवटच्या चार कार्यकर्त्यांकडे वळतो. जर शेवटचे चार कार्यकर्तेही आपल्याला वाचवू नाही शकले तर आपण निर्विचार होऊन जातो व अश्या स्थितीत आपल्या मनात काहीही विचार येणे बंद होते.
ENTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ne-Ti-Fe-Si-Ni-Te-Fi-Se ह्या व्यक्तिमत्वात Ne प्रबळ असून ह्यांना नव नवीन युक्त्या पटकन सुचतात, व बाहेरील कल्पना हि पटकन येतात. Ti सहाय्यक असून तो ह्या युक्त्यांना व कल्पनेला तर्काच्या जालामधून घालतो. Fe तिसऱ्या स्थळावर असून तो दुसऱ्यांच्या भावना ओळखण्यात मजा घेतो. यात दुसऱ्यांना हसवणे हा छंद हे करू शकतात. Si निकृष्ट असून लक्षात ठेवणाऱ्या गोष्टींची ह्यांना समस्या होते, जसे नित्यक्रम, नियम व परंपरा. Ni शत्रू असून यांना स्वतःच्या इच्छांवर शंका असते. Te टीकाकार असून ते सर्वदा बाहेरील माहितीवरून केलेल्या तर्कावर टीका करत असतात. Fi हा फसव्या असून त्यांना स्वतःच्या भावनांची व नित्याची काहीच माहिती नसते. Se हा राक्षस असून त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती जमवणे कठीण जाते.
Comments
Post a Comment