ESTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Se-Ti-Fe-Ni-Si-Te-Fi-Ne
ह्या व्यक्तिमत्वात Se प्रबळ असून ह्यांना नव नवीन संवेदनशील माहिती गोळा करणे सोप्पे जाते, ते सतत हेच करत असतात, आपल्या औतिभौतीतील संवेदनशील माहिती गोळा करत असतात. Ti सहाय्यक असून तो हि संवेदनशील माहिती घेऊन त्यावर तर्क लावून एक तर्कजाल तैय्यार करतो, व तो हा विकसित करत असतो. Fe तिसऱ्या स्थळावर असून दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणे ह्या व्यक्तिमत्वाला मजेदार वाटते. दुसऱ्यांच्या भावना कश्या बदलतात ह्यात ह्यांना आवड असते, दुसऱ्यांना हसवणे हा अश्या व्यक्तिमत्वाचा छंद असू शकतो. Ni निकृष्ट असून ह्यांना स्वतःच्या मनातील संकल्पना लक्षात घेऊन काम करणे कठीण जाते. जसे स्वतःची स्वतःच्या भविष्याबद्दलची संकल्पना घेऊन ते पुढे करणे हे त्यांना अवघड जातं. Si शत्रू असून त्यांना स्वतःच्या आठवणींबद्दल भीती असते कि त्यांच्या आठवणी चांगल्या नाही आहेत. Te टीकाकार असून ते दरवेळेस बाहेरील माहिती आणि त्याच्यावरील तर्कावर टीका करत असतात. Fi फसव्या असून त्यांना स्वतःच्या भावनांची व नित्याची जाणीव नसते. Ne राक्षस असून ते बाहेरील अंतर्ज्ञान जमवत नाहीत, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या काय इच्छा आहेत ह्याच्याशी काही संबंध नसतो.
Comments
Post a Comment