Skip to main content

MBTI शी ओळख

 कार्ल जंग नुसार आपल्या मनकार्याचे चार भाग असतात. ते म्हणजे भावना(F), तर्क(T), संवेदना(S) आणि अंतर्ज्ञान(N). तर यातील भावना आणि तर्क आपणास निर्णय घेण्यास मदत करतात , म्हणून यांना निर्णयी कार्यकर्ते असे म्हटले जाते. भावना हा कार्यकर्ता मनुष्याचा मनातील रसांवरून निर्णय घेतो.  तर तर्क हा तर्क लावून निर्णय घेतो. संवेदना आणि अंतर्ज्ञान हे आपणास माहिती गोळा करण्यास मदत करतात, ह्यांना आपण माहिती जमावणारे कार्यकर्ते असं म्हणतो. संवेदना हे संवेदनशील माहिती गोळा करते. तर अंतर्ज्ञान हे जगातील प्रत्येक गोष्टीला नमुने म्हणून बघतो व त्या मागील संकल्पना शोधायचा प्रयत्न करतो किंवा नवीन युक्ती काढायचा प्रयत्न करतो.  कोणताही कार्यकर्ता एकतर अंतर्मनस्वीन(e) किंवा बाह्यमनस्वीन(i) असू शकतो. अंतर्मनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनातल्या आतील माहितीशी संबंधुन आहे. व बाह्यमनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनाच्या बाहेर च्या माहितीशी संबंधुन आहे. तर एकूण मानकार्याचे आठ कार्यकर्ते असतात. 

ते म्हणजे-:

१) अंतर्मनस्वीन तर्क (Ti):अंतर्मनस्वीन तर्क हा मनातल्या आतील माहितीचा उपयोग करतो तर्क लावण्यात. हा एक तर्काचा महाजाल बनवून ठेवतो. ज्याच्याकडे हा कार्यकर्ता असतो तो स्वतःची ओळख त्याच्या मनातील तर्क जालाने करतो. तर्क जालवाढवणे हे एकमेव अंतर्मनस्वीन तर्क याचे काम आहे. 

२) बाह्यमनस्वीन तर्क (Te): बाह्यमनस्वीन तर्क हा मनातल्या बाहेरची माहिती घेऊन तर्क लावतो. ह्या बाहेरील महतिसाठी वाट पाहायला हि तैय्यार असतो. बाह्यमनस्वीन तर्क तर्कजाल नाही बनवत, तर क्षणापुरता तर्क लावतो. 

३) अंतर्मनस्वीन भावना (Fi): अंतर्मनस्वीन भावना हा स्वतःच्या भावनेच्या माहितीवरून निर्णय घेतो. स्वतःच्या आतील भावनिक स्तिथी कशी सुखरूप ठेवायची ह्याच्याशी संबंधुन हा कार्यकर्ता आहे. 

४) बाह्यमनस्वीन भावना (Fe): बाह्यमनस्वीन भावना हा आपल्या मनातील बाहेरील , म्हणजेच, दुसऱ्याच्या भावनांवर निर्णय घेतो. आपल्या आजूबाजूस असलेल्या भावनिक स्तिथीला कशे सुखरूप ठेवायचे हे ह्याचे कार्य आहे. 

५) अंतर्मनस्वीन संवेदना (Si): अंतर्मनस्वीन संवेदना हा कार्यकर्ता मनात संवेदनशील माहिती जपून ठेवतो व त्यावर एकाग्रता ठेवतो. 

६) बाह्यमनस्वीन संवेदना (Se): बाह्यमनस्वीन संवेदना हा कार्यकर्ता नेहमी बाहेरून येणाऱ्या नवीन संवेदनशील माहिती वर एकाग्रता ठेऊन असतो. 

७) अंतर्मनस्वीन अंतर्ज्ञान (Ni): अंतर्मनस्वीन अंतर्ज्ञान हे मनातील जमवलेले जगाबद्दल ची संकल्पनेवर एकाग्रता ठेऊन असते व त्याला अद्यतनित करतो. 

८) बाह्यमनस्वीन अंतर्ज्ञान (Ne): बाह्यमनस्वीन अंतर्ज्ञान हा नवीन नवीन येणाऱ्या युक्त्यांवर लक्ष केंद्रित करून असतो. 


प्रत्येकाच्या मनात वेगवगेळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे महत्व असते. ज्याला सगळ्यात जास्त महत्व असते त्याला पहिला कार्यकर्ता किंवा प्रबळ कार्यकर्ता असे म्हटले जाते. अशेच चार कार्यकर्ते निर्णय व माहिती गोळा करण्यास एका व्यक्तीला मदत करतात. ह्यांच्या मानसिक महत्वानुसार ह्यांची एक चवड तैय्यार होते. ह्या चावडीत वरती असतो प्रबळ कार्यकर्ता , मग येतो सहाय्यक कार्यकर्ता , मग येतो तिसरा कार्यकर्ता व शेवटी येतो निकृष्ट कार्यकर्ता. ह्यांचे मनातील कार्य आपण एकदा जाणून घेऊयात. 

१) प्रबळ कार्यकर्ता : हा कार्यकर्ता आपण सतत वापरतो, एवढा सतत वापरतो कि आपल्याला कळत देखील नाही कि आपण हा वापरतोय. हा कार्यकर्ता वापरण्यात आपण खूप पटाईत असतो. आपल्या मनातील पहिला विचार ह्यानेच सुरु होतो. 

२) सहाय्यक कार्यकर्ता : हा कार्यकर्ता पहिल्या किव्वा प्रबळ कार्यकर्त्याला सहाय्य करतो. हा आपण कधी कधी वापरतो, ह्यातही आपण पटाईत असतो पण प्रबळ कार्यकर्ता एवढे नाही. 

३) तिसरा कार्यकर्ता : हा कार्यकर्ता आपल्याला एवढा  नीट वापरता नाही येत. हा कार्यकर्ता वापरायला आपल्याला मजा येते कारण हा आपल्यासाठी नवीन असतो. ह्या कार्यकर्त्या सोबत आपण थोडं खेळकर असतो.

४) निकृष्ट कार्यकर्ता : ह्या कर्यकर्त्याबद्दल आपल्याला जास्त काहीच माहित नसते. ह्या कार्यकर्त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ह्याचा आपल्याला त्रास होतो. हा आपल्याला नीट वापरता नाही येत. 


आता कोणता कार्यकर्ता कुठे जाईल ह्याचे काही नियम आहेत, ह्या नियमानुसार सोळा व्यक्तिमत्वे तैय्यार होतात. ह्या व्यक्तिमत्त्वांना चार अक्षराने दर्शवले जाते. पहिला अक्षर E किव्वा I  असते. दुसरं N किव्वा S असते. तिसरं  T किव्वा F असते. चौथं J किव्वा P असते. 

नियम :

१) दुसरं व तिसरं अक्षर व्यक्तिमत्वाच्या चवडीतील पहिले दोन कार्यकर्ते कोणत्या प्रकारचे आहेत हे सांगते. जसं ENTP मधील पहिले दोन कार्यकर्ते N व T आहेत, म्हणजे अंतर्ज्ञान व तर्क ह्या पद्धतीची आहेत. 

२) चौथं अक्षर हे दाखवते कि पहिल्या दोन पैकी माहिती गोळा करणारा कार्यकर्ता  हा अंतर्मनस्वीन आहे का बाह्यमनस्वीन . जर J असेल तर अंतर्मनस्वीन नाहीतर जर P असेल तर बाह्यमनस्वीन. 

३) जर पहिल्या दोन कार्यकर्त्यांपैकी एक अंतर्मनस्वीन असेल तर दुसरा बाह्यमनस्वीन असणार, व या उलटे. 

४) पाहिलं अक्षर पहिला कार्यकर्ता अंतर्मनस्वीन आहे का बाह्यमनस्वीन हे सांगतो. जर E असेल तर पहिला कार्यकर्ता बाह्यमनस्वीन असणार नाहीतर जर I असेल तर अंतर्मनस्वीन. 

५) पहिला कार्यकर्ता ज्या प्रकारचा(निर्णयी का माहिती जमवणारा) असेल त्या प्रकारातील दुसर्याप्रकारचा कार्यकर्ता निकृष्ट स्थळी असणार. व जर पहिला अंतर्मनस्वीन असेल तर निकृष्टवा बाह्यमनस्वीन असणार व या उलटे. असेच दुसऱ्या व तिसऱ्या कार्यकर्त्याचे आहे. 


तर नियमानुसार , ENTP मध्ये 

१) पहिल्या व दुसऱ्या स्थानी N व T येतो. 

२) N मधले Ne आहे. 

३) पहिल्या व दुसऱ्या स्थळी Ne व Ti आहे. 

४) पहिले दोन कार्यकर्ते Ne-Ti  ह्या पद्धतीने आहेत. 

५) ENTP ह्या व्यक्तिमत्वाचे चवड Ne-Ti-Fe-Si असे आहे. 

Comments

Popular posts from this blog

ENTP व्यक्तिमत्वशी ओळख

 ENTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ne-Ti-Fe-Si-Ni-Te-Fi-Se ह्या व्यक्तिमत्वात Ne प्रबळ असून ह्यांना नव नवीन युक्त्या पटकन सुचतात, व बाहेरील कल्पना हि पटकन येतात. Ti सहाय्यक असून तो ह्या युक्त्यांना व कल्पनेला तर्काच्या जालामधून घालतो. Fe तिसऱ्या स्थळावर असून तो दुसऱ्यांच्या भावना ओळखण्यात मजा घेतो. यात दुसऱ्यांना हसवणे हा छंद हे करू शकतात. Si निकृष्ट असून लक्षात ठेवणाऱ्या गोष्टींची ह्यांना समस्या होते, जसे नित्यक्रम, नियम व परंपरा. Ni शत्रू असून यांना स्वतःच्या इच्छांवर शंका असते. Te टीकाकार असून ते सर्वदा बाहेरील माहितीवरून केलेल्या तर्कावर टीका करत असतात. Fi हा फसव्या असून त्यांना स्वतःच्या भावनांची व नित्याची काहीच माहिती नसते. Se हा राक्षस असून त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती जमवणे कठीण जाते.