ISFJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Si-Fe-Ti-Ne-Se-Fi-Te-Ni
ह्या व्यक्तिमत्वात Si प्रबळ असून ह्यांना गोष्टी लक्षात ठेवणे सोप्पे जाते, त्यामुळे ह्यांना नित्यक्रम, परंपरा व नियम महत्वाचे वाटतात. हे Fe सहाय्यक असल्याने बाकीच्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतात. Ti तिसऱ्या स्थळी असून कोणती गोष्ट अशी का काम करते ह्यावर विचार करण्यास ह्यांना मजा येते, व तर्क लावून सत्य शोधून काढणे ह्यांना मस्त वाटते. Ne निकृष्ट असून ह्यांना बाहेरील अंतर्ज्ञान गोळा करणे कठीण वाटते, म्हणून त्याची भीतीही लागून राहते, जसे लोकांच्या इच्छा. Se शत्रू असून त्यांना ते दुसऱ्यांना चांगला अनुभव देत आहेत का नाही याची भीती लागून राहते. Fi टीकाकार असून ते सतत स्वतःच्या भावनेची टीका करत असतात. Te फसव्या असून त्यांना बाहेरील माहितीवर तर्क लावून उपाय काढणे येत नाही. Ni राक्षस असून त्यांना स्वतःच्या मनातील संकल्पना वर लक्ष केंद्रित करणे अवघड वाटते.
Comments
Post a Comment