Skip to main content

INFP व्यक्तिमत्वाशी ओळख

 INFP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Fi-Ne-Si-Te-Fe-Ni-Se-Ti 

ह्या व्यक्तिमत्वात Fi प्रबळ असल्याने त्यांना स्वतःच्या भावनांबद्दल बरीच माहिती असते. Ne हे सहाय्यक असून ते स्वतःच्या भावनेला बाहेरील कोणते कल्पना आवडते हे हे व्यक्तिमत्व बघते. व तिसऱ्या स्थळाच्या Si मध्ये जपून ठेवते. याने ह्या व्यक्ती खूप नैतिकदार असतात. Ne सहाय्यक असल्याने नैतिकपणा कसा सर्जनशिल पद्धतीने पार पडावा हे ह्या व्यक्तींना कळते. Te निकृष्ट असल्याने यांना तर्क लावून कोणती गोष्ट कशी करायची हे जास्त जमत नाही. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात ह्याची ह्यांना भीती असते. Fe शत्रू असल्याने यांना भीती राहते कि बाकीचे वाईट आहेत. म्हणजेच दुसऱ्यांच्या भावनांची भीती वाटते. Ni टीकाकार असल्याने INTP सारखेच हे देखील स्वतःच्या इच्छेला टीका करतात. Si तिसऱ्या स्थळी असल्याने ह्यांना नित्यक्रम आवडतो, पण यात ते माहीर नसतात. Se फसव्या असल्याने हे बाहेरील संवेदनशील माहितीवर जास्त लक्ष देत नाहीत,यामुळे यांना त्रास होतो, जसे कधी कधी चुकून लागते व यांना कळतही नाही. Ti हा राक्षस असल्याने ह्यांना तर्क लावून कोणती स्वतःसाठी निर्णय घेणे अतिशय अवघड जाते, कारण त्यांच्या मनात ह्यासाठी जागाच नसते.

Comments

Popular posts from this blog

MBTI शी ओळख

 कार्ल जंग नुसार आपल्या मनकार्याचे चार भाग असतात. ते म्हणजे भावना(F), तर्क(T), संवेदना(S) आणि अंतर्ज्ञान(N). तर यातील भावना आणि तर्क आपणास निर्णय घेण्यास मदत करतात , म्हणून यांना निर्णयी कार्यकर्ते असे म्हटले जाते. भावना हा कार्यकर्ता मनुष्याचा मनातील रसांवरून निर्णय घेतो.  तर तर्क हा तर्क लावून निर्णय घेतो. संवेदना आणि अंतर्ज्ञान हे आपणास माहिती गोळा करण्यास मदत करतात, ह्यांना आपण माहिती जमावणारे कार्यकर्ते असं म्हणतो. संवेदना हे संवेदनशील माहिती गोळा करते. तर अंतर्ज्ञान हे जगातील प्रत्येक गोष्टीला नमुने म्हणून बघतो व त्या मागील संकल्पना शोधायचा प्रयत्न करतो किंवा नवीन युक्ती काढायचा प्रयत्न करतो.  कोणताही कार्यकर्ता एकतर अंतर्मनस्वीन(e) किंवा बाह्यमनस्वीन(i) असू शकतो. अंतर्मनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनातल्या आतील माहितीशी संबंधुन आहे. व बाह्यमनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनाच्या बाहेर च्या माहितीशी संबंधुन आहे. तर एकूण मानकार्याचे आठ कार्यकर्ते असतात.  ते म्हणजे-: १) अंतर्मनस्वीन तर्क (Ti):अंतर्मनस्वीन तर्क हा मनातल्या आतील माहितीचा उपयोग करतो तर्क लावण्यात. हा एक त...

ENTP व्यक्तिमत्वशी ओळख

 ENTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ne-Ti-Fe-Si-Ni-Te-Fi-Se ह्या व्यक्तिमत्वात Ne प्रबळ असून ह्यांना नव नवीन युक्त्या पटकन सुचतात, व बाहेरील कल्पना हि पटकन येतात. Ti सहाय्यक असून तो ह्या युक्त्यांना व कल्पनेला तर्काच्या जालामधून घालतो. Fe तिसऱ्या स्थळावर असून तो दुसऱ्यांच्या भावना ओळखण्यात मजा घेतो. यात दुसऱ्यांना हसवणे हा छंद हे करू शकतात. Si निकृष्ट असून लक्षात ठेवणाऱ्या गोष्टींची ह्यांना समस्या होते, जसे नित्यक्रम, नियम व परंपरा. Ni शत्रू असून यांना स्वतःच्या इच्छांवर शंका असते. Te टीकाकार असून ते सर्वदा बाहेरील माहितीवरून केलेल्या तर्कावर टीका करत असतात. Fi हा फसव्या असून त्यांना स्वतःच्या भावनांची व नित्याची काहीच माहिती नसते. Se हा राक्षस असून त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती जमवणे कठीण जाते.

ISFJ व्यक्तिमत्वाशी ओळख

 ISFJ  व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Si-Fe-Ti-Ne-Se-Fi-Te-Ni  ह्या व्यक्तिमत्वात Si प्रबळ असून ह्यांना गोष्टी लक्षात ठेवणे सोप्पे जाते, त्यामुळे ह्यांना नित्यक्रम, परंपरा व नियम महत्वाचे वाटतात. हे Fe सहाय्यक असल्याने बाकीच्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतात. Ti तिसऱ्या स्थळी असून कोणती गोष्ट अशी का काम करते ह्यावर विचार करण्यास ह्यांना मजा येते, व तर्क लावून सत्य शोधून काढणे ह्यांना मस्त वाटते. Ne निकृष्ट असून ह्यांना बाहेरील अंतर्ज्ञान गोळा करणे कठीण वाटते, म्हणून त्याची भीतीही लागून राहते, जसे लोकांच्या इच्छा. Se शत्रू असून त्यांना ते दुसऱ्यांना चांगला अनुभव देत आहेत का नाही याची भीती लागून राहते. Fi टीकाकार असून ते सतत स्वतःच्या भावनेची टीका करत असतात. Te फसव्या असून त्यांना बाहेरील माहितीवर तर्क लावून उपाय काढणे येत नाही. Ni राक्षस असून त्यांना स्वतःच्या मनातील संकल्पना वर लक्ष केंद्रित करणे अवघड वाटते.