Skip to main content

INFJ व्यक्तिमत्वाशी ओळख

 INFJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ni-Fe-Ti-Se-Ne-Fi-Te-Si 

ह्या व्यक्तिमत्वात Ni प्रबळ असल्याने त्यांची जगाची संकल्पना विकसित असते. ह्यात त्यांची स्वतःची संकल्पना देखील विकसित असते, हि पूर्ण करण्यासाठी ते सहाय्यक Fe म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांचा उपयोग करतात. Ti तिसऱ्या स्थळी असल्याने ते आतील माहितीवर तर्क लावणे त्यांना मस्त वाटते. Se निकृष्ट असल्याने त्यांना संवेदनशील माहिती गोळा करण्यास कठीणाई येते, व ह्यामुळे त्यांना ते दुसऱ्यांना चांगला अनुभव नाही देत आहेत ह्याची भीती लागून राहते. Ne शत्रू असल्याने त्यांना दुसरे काय इच्छा घेऊन त्यांच्याकडे येतायेत ह्याची भीती राहते. Fi टीकाकार असल्याने ते सारखे स्वतःच्या भावनांची टीका करत असतात. ते स्वतः चांगले नाहीयेत याची भीती त्यांना लागून राहते. Te फसव्या असल्याने त्यांना तर्क लावून बाहेरील माहिती घेऊन निर्णय घेणे अवघड जाते. Si राक्षस असल्याने त्यांना गोष्टी लक्षात ठेवणे खूप कठीण जाते कारण त्यांच्या मनात ह्यासाठी जागाच नाहीये.

Comments