ESFJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Fe-Si-Ne-Ti-Fi-Se-Ni-Te
ह्या व्यक्तिमत्वात Fe प्रबळ असल्याने यांना दुसऱ्यांच्या भावना ओळखण्यात सोप्पे जाते. Ne तिसऱ्या स्थळी असल्याने यांना बाहेरील अंतर्ज्ञानावर लक्ष केंद्रित करणे मजेशीर वाटते. त्यात बदल होऊन नवीन अंतर्ज्ञान आल्यावर त्यांना बरे वाटते. जसे दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात त्यांना मस्त वाटते. ते पूर्ण करण्यासाठी ते स्वतःच्या Fe व जुन्या रीत परंपरांचा म्हणजेच Si चा फायदा करून घेतात. त्यांना कोणत्या रितेने लोकांचे कशे भावना तैय्यार होतात हे त्यांच्या Si मध्ये माहित असते.
Ti हा निकृष्ट असल्याने ह्यांना तर्क लावून कोणती गोष्ट का काम करतेय हे काढणं अवघड जातं, ह्यामुळे ते ढ आहेत ह्याची भीती त्यांना राहते. Fi शत्रू असल्यामुळे ते स्वतःच्या भावनांना भितात, त्यांना ते स्वतः चांगले आहेत का ह्याची भीती राहते. Se टीकाकार असल्याने हे ESTJ सारखेच आजूबाजूच्या परिसरातील संवेदनशील माहितीवर टीका करतात, जसे दुसऱ्यांच्या कपड्यांवर. Ni फसव्या असल्यामुळे ह्यांना स्वतःच्या जगाच्या संकल्पेनेची भान नसते व त्या संकल्पनेत त्यांनी भविष्यात काय करावा ह्याची हि जान नसते. Te राक्षस असल्याने ह्यांना कोणत्याही गोष्टीवर तर्कस्त उपाय लावणे अवघड जाते, कारण हे करण्यासाठी त्यांच्या मनात जागाच नसते.
Comments
Post a Comment