ISTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ti-Se-Ni-Fe-Te-Si-Ne-Fi
ह्या व्यक्तिमत्वात Ti प्रबळ असल्याने कोणती गोष्ट कशी काम करते ह्याचा त्यांना तर्कस्त माहिती असते, ते ह्याचाच एक तर्कजाल बनवून ठेवतात. कारण ते स्वतःच्या आतील माहितीवर लक्ष केंद्रित करतात म्हणून त्यांचे उपाय त्यांच्यासाठी असतात , ते दुसऱ्यांसाठी काम करतील का नाही हे माहित नाही. Se सहाय्यक असल्याने ते स्वतःचे तर्क सिद्ध करण्यासाठी बाहेरील जगातून संवेदनशील माहिती गोळा करतात. व Se दुसऱ्या स्थळावर असल्याने त्यांना बाहेरील जगातील संवेदनशील माहिती पटकन गोळा करता येते व त्यांना बाहेरील जगाशी पटकन व हुशार रित्या काम करता येते. ह्यामुळे ते अतिशय हुशार खेळाडू बनू शकतात. Ni तिसऱ्या स्थळी असल्याने त्यांना जगाच्या संकल्पेनेशी खेळण्यात मजा येते,या संकल्पेनेत ते काय करू शकतात ह्याचीही त्यांना नीट भान नसते व ते कधी कधी अतिशय अवघड गोष्ट करायचा प्रयत्न करतात व चपळतेने करूनही दाखवतात. Fe निकृष्ट असल्याने त्यांना दुसऱ्यांच्या भावना समजणे अवघड जाते व ह्याची त्यांना भीती राहते. Te शत्रू असल्याने त्यांना दुसरे ढ आहेत ह्याची भीती राहते, व ते स्वतः हुशार असल्याने त्यांना असे वाटते कि तेच हुशार आहेत ह्या जगात. Si टीकाकार असल्याने त्यांना गोष्टी लक्षात राहण्यात अवघडता निर्माण होते. Ne फसव्या असल्याने त्यांना बाहेरील अंतर्ज्ञानाशी संबंध येत नाही, त्यांना दुसऱ्यांच्या इच्छा कळत नाहीत. कोणाची इच्छा असेल त्यांना फसवायची तर ती हि त्यांना कळत नाही. Fi राक्षस असल्याने त्यांना स्वतःच्या भावनांवर लक्ष ठेवणे अवघड जाते, कारण त्यांच्या मनात त्यासाठी जागाच नाहीये
Comments
Post a Comment