INTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ti-Ne-Si-Fe-Te-Ni-Se-Fi
ह्या व्यक्तिमत्वात Ti प्रबळ असल्याने हे व्यक्तिमत्व तर्काचा एक मोठा महाजाल बनवून ठेवतं, कोणती गोष्ट कशी काम करते ह्याची त्यांना माहिती असते, त्यासाठी ते आपल्या सहाय्यक Ne चा फायदा उठवतात, बाहेरील अंतर्ज्ञान माझ्या तर्कासोबत मिळते का नाही हे ते आयुष्यभर करतात. तिसऱ्या स्थळी Si असल्याने त्यांना लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी आवडतात व ते बऱ्याच ठिकाणांवरून संवेदनशील माहिती गोळा करून ठेवतात, मोठा माहितीचा भांडार असून, Ne मुळे नवीन युक्त्या सुचत असून, व Ti मुळे आधीच्या तर्कास ते मिळतात का नाही हे बघणे सोप्पं असून अशी व्यक्ती कोणत्याही समस्येवर चांगला उपाय ते शोधून काढू शकतात. ह्यामुळे ह्यांना समस्यानिवारक हे पद शोभते. Fe निकृष्ट असल्याने दुसऱ्यांच्या भावना ओळखणे यांना अवघड जाते. दुसऱ्यांच्या आपल्याबद्दल काय भावना आहेत याची त्यांना भीती राहते. Te शत्रू असल्याने यांना बाकीचे सगळे ढ आहेत ह्याची भीती राहते. Ni टीकाकार असल्याने ते सतत स्वतःच्या इच्छांवर टीका करत असतात. ह्यामुळे ते कधी कधी स्वतः मध्ये कोणतीही इच्छा राहू देत नाहीत. Se फसव्या असल्यानं बाहेरील संवेदनशील माहिती ह्यांना गोळा करणे अतिशय अवघड जाते व ते हे करत नाहीत,त्यामुळे हे घुळे पणे वागतात. Fi हा राक्षस असल्याने त्यांना स्वतःच्या भावना समजून घेणे अवघड जाते, कारण त्यांच्या मनात या साठी जागाच नाही उरत.
Comments
Post a Comment