ESTJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Te-Si-Ne-Fi-Ti-Se-Ni-Fe
ह्यांच्यामध्ये Te प्रबळ असल्या मुळे हे व्यक्तिमत्व खूप तर्कस्त असते. कोणत्याही गोष्टीचे तर्कस्त उपाय काढणे हे त्यांना पटकन जमते. Si सहाय्यक असल्यामुळे ते भूतकाळातील गोष्टी पटकन लक्षात ठेवतात व त्यावर लक्ष केंद्रीत करतात. ह्यामुळे त्यांना काळानुसार न बदलणाऱ्या गोष्टी आवडतात, जसे नियम, परंपरा. ते तर्क व नियम आणि परंपरा वापरून ह्यांचा पुरेपूर फायदा करून आपल्या Te चे कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करतात. Ne तिसऱ्या स्थळी असल्याने ह्यांना जगातील अंतर्ज्ञान बघण्यास मजा येते व त्यात ते माहीर नसतात. दुसऱ्याच्या इच्छा व आकांक्षा जाणून घेणे हे एक अंतर्ज्ञानच आहे, हे ते बघतात व त्यांना हे कधी कधी पुरवावेसे वाटते. Si ह्याला नित्यक्रम देखील आवडते कारण ते हि काळानुसार बदलत नाही, अश्या व्यक्ती खूप नित्यक्रम पाळतात, ह्यामुळे ह्या जास्त फिट हि असू शकतात. Fi निकृष्ट असल्यामुळे ह्यांना स्वतःच्या भावना जाणून घेण्यास कठीण असते. त्यात असे आयुष्यभर झाल्यामुळे मी कोण आहे ह्याची माहिती त्यांना फारशी नसते. Te प्रबळ असल्यामुळे ते बाहेरील माहितीवरून निर्णय घेतात, ह्या माहितीमध्ये दुसऱ्यांचे विचार देखील असतात, दुसऱ्यांचे विचार त्यांना महत्वाचे वाटतात व Fi निकृष्ट असल्यामुळे दुसऱ्यांच्या स्वतःबद्दलच्या विचारांवरून स्वतःची किंमत ते मोजतात. Ti शत्रू असल्यामुळे त्यांना ते स्वतः ढ आहेत ह्याची भीती असते. व Se टीकाकार असल्यामुळे ते दुसऱ्याच्या देखण्यावर किव्वा आपल्या स्वतःच्या आजूबाजूतील परिसरावर टीका करण्यास सज्ज असतात. Ni फसव्या असताना त्यांना स्वतःच्या अंतर्ज्ञानाबद्दल माहिती नसते, म्हणजे ते संकल्पना नाही बनवत किव्वा कल्पना नाही करत, ह्यामुळे त्यांना स्वतःच्या इच्छांबद्दल एवढी माहिती नसते. Fe राक्षस असल्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या भावनांबद्दल काही महत्व नसते कारण त्यांच्या मनात एवढी जागाच नसते कि ते त्यावर लक्ष देऊ शकतील.
Comments
Post a Comment