ENTJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Te-Ni-Se-Fi-Ti-Ne-Si-Fe
ह्या व्यक्तिमत्वात Te प्रबळ असल्यामुळे हे व्यक्तिमत्व खूप तर्कस्त असते. पटकन विचार करून एखाद्या समस्येवर उपाय काढणे ह्यांना जमते व ह्यासाठी ते आपल्या सहाय्यक Ni चा पुरेपूर फायदा करून घेतात, Ni म्हणजे त्यांची स्वतःची जगाची संकल्पना. ह्या संकल्पनेत त्यांनी स्वतला देखील बघितले असते व त्यांनी पुढे काय करावे हे हि ह्या संकल्पनेत असते. त्यामुळे हि व्यक्ती खूप भविष्यावर लक्ष केंद्रित करून असते. तसेच पुढे काय घडेल ह्याची संकल्पना घेऊन हि व्यक्ती असते व नवीन नवीन गोष्टी करायचे तारिके ह्यांना सुचत असतात त्यामुळे ह्या व्यक्ती खूप सर्जनशील असतात. Se तिसऱ्या स्थळी असल्याने ह्यांना बाहेरील संवेदनशील माहिती घेण्यात मजा येते व यात बदल झाल्यास त्यांना आवडते, हा बदल ते स्वतःहून देखील घडवून आणतात, जसे कोणता प्रकल्प करणे किव्वा नव नवीन गोष्टी करणे ह्यांना आवडते. व ह्यांना नवनवीन युक्त्या तर सुचतातच, व त्या कश्या पार पडायच्या ह्या Te ने हि ह्यांना कळते ह्यामुळे कोणत्याही प्रकल्पाला दिशा देण्यास हे महत्वाचे ठरतात. Fi निकृष्ट असल्यामुळे ह्यांना स्वतःच्या भावनांची एवढी जाणीव नसते. त्यामुळे हे कोणत्याही निर्णयात भावना येऊन देत नाहीत. ह्याचा अर्थ असा नव्हे कि ह्यांना भावनाच नाहीत. Ti शत्रू असल्यामुळे ह्यांना स्वतःच्या हुशारीवर संशय असतो व Fi निकृष्ट असल्यामुळे स्वतःच्या चांगुलपणावर. Ne टीकाकार असल्यामुळे ह्यांना आपल्या आजूबाजूच्या अंतर्ज्ञानावर टीका असते, जसे दुसऱ्याच्या इच्छांवर टीका करतात. Si हा फसव्या असल्यामुळे ह्यांना ज्या गोष्टी भूतकाळाशी संबंधित आहेत अश्या गोष्टी दुर्लक्षित होतात, जसे नित्यक्रम किव्वा परंपरा. ह्यामुळे त्यांना स्वतःची काळजी घेणे अवघड जाते. Fe राक्षस असल्यामुळेल त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची एवढी परवा नसते, कारण ह्यांचा मनात एवढी जागाच नसते कि ते ह्या गोष्टी बाबत परवा करू शकतील.
Comments
Post a Comment