ENFJ व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Fe-Ni-Se-Ti-Fi-Ne-Si-Te
ह्या व्यक्तिमत्वात Fe प्रबळ असल्याने ह्यांना बाकीचांच्या भावना पटकन कळतात व त्या कश्या बदलतील याची संकल्पना सहाय्यक Ni ने बनवून ठेवली असते. ह्यामुळे ह्यांना कधी कधी दुसऱ्यांना खुश ठेवण्यात जास्त आवड असते. आयुष्यभर Fe माहिती गोळा केल्यामुळे ह्यांची Ni संकल्पना हि भावनांशी संबंधित असते. Se तिसऱ्या स्थळी असल्याने ह्यांना संवेदनशील माहिती गोळा करण्यात मजा येते पण यात हे प्रबळ नसतात. संवेदनशील माहितीत बदल झाल्यास व नवीन माहिती भेटल्यास त्यांना मजा येते. हा बदल ते स्वताहूनही घडवतात, पण ENTJ एखादा समस्येचा उपाय म्हणून बदल घडवतो तर हे दुसऱ्यांच्या भावनेशी संबंधून बदल घडवतात. Ti निकृष्ट असल्यामुळे त्यांना तर्क लावण्यात व त्यांने स्वतः कोण आहोत हि ओळख करून घेण्यात कठीण होते. त्यांना ते स्वतः ढ आहेत ह्याची भीती राहते. Fi शत्रू असल्यामुळे त्यांना स्वतःच्या चांगुलपणावर संशय असतो. व Ne टीकाकार असल्यामुळे त्यांना बाहेरील येणाऱ्या अंतरज्ञानावर टीका करणे सहज असते, जसे दुसर्यांचा इच्छांवर. Si फसव्या असल्याने ह्यांना भूतकाळाच्या गोष्टीवर लक्ष ठेवणे अवघड जाते, म्हणजे लक्षात ठेवण्याच्या गोष्टींवर, जसे नित्यक्रम, ह्यामुळे त्यांना स्वतःची काळजी घेणे अवघड जाते. Te राक्षस असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीवर तर्कस्त उपाय काढणे अवघड जाते कारण त्यांच्या मनात ह्यासाठी जागाच नसते.
Comments
Post a Comment