ENFP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ne-Fi-Te-Si-Ni-Fe-Ti-Se
ह्या व्यक्तिमत्वात Ne प्रबळ असल्याने त्यांना बाहेरील अंतर्ज्ञान गोळा करण्यात वेळ नाही लागत, म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या इच्छांबद्दल माहिती असते व दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे कळते कारण त्यांचा सहाय्यक Fi आहे, त्यांना स्वतःच्या भावनांबद्दल खूप माहिती असते, असे त्यांना भावनांबद्दल बरेच माहिती असते, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या भावना लगेच कळतात, व तिसऱ्या स्थळी Te असून त्यांना दुसऱ्यांच्या मनातील विचार देखील कळतात. Te तिसऱ्या स्थळी असल्याने त्यांना बाहेरील माहिती गोळा करून त्यावर तर्क लावण्यात मजा येते, ह्यामुळे कोणाच्या मनात काय चाललंय माहिती असताना त्यावर तर्क लावून त्यांना त्या तर्काला तर्क कसा लावायचा हे कळते व त्यात मजा देखील येते, म्हणून ते दुसऱ्यांच्या मनातील विचार बदलू शकतात. Si निकृष्ट असल्यामुळे त्यांना नित्यक्रम पाळणे अवघड जाते, व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी अवघड जातात. Ni शत्रू असल्यामुळे ते स्वतःच्या भविष्याबद्दल घाबरत असतात. म्हणजेच त्यांच्या जगाच्या संकल्पेनेतील स्वतःच्या भविष्याचा संकल्पाने बद्दल घाबरत असतात. Fe टीकाकार असल्या मुळे ते दुसऱ्यांच्या भावनांवर टीका करत असतात. Ti फसव्या असल्यामुळे त्यांना स्वतःच्या आतील माहितीवरून तर्क लावून सत्य ओळखता नाही येत. Se राक्षस असल्यामुळे त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती गोळा करून निर्णय घेणं अवघड जातं. ह्यामुळे ते चपळ नसतात.
Comments
Post a Comment